गौतम बुद्ध कथा मराठी Gautam Buddha Story - Readinghubmarathi


राजाच्या घरी मुलगा जन्मला कोणी तरी राजाला सांगितले कि, हा मुलगा मोठेपणी संन्यासी होणारबुद्धाचे नाव सिद्धार्थ ठेवले गेले "Gautam Buddha Original Name is Siddhartha". राजाने विचार केला, आता काय करावे

मोठया मोठ्या लोकांशी विचार विनिमय केला. एक उपाय शोधला जसा राजकुमार मोठा होतो. त्याला मित्र म्हणून त्याच्याच वयाची मुले ठेवायची. त्यात कोणी मोठा नाही कि, छोटा नाही. ज्याणेकरून सिद्धार्थला कळता कामा नये कि, जगात लहान मोठे सुद्धा असतात

हळूहळू दिवस जात होते. राजा मरण पावला. सिधदार्थाला दरबारात घेऊन जाण्यासाठी काही लोक आली. जेव्हा सिद्धार्थाची स्वारी चालली होती. तेव्हा रस्त्यावर एक उंट मरण पावला होता. सिद्धार्थाने विचारले, "हे काय आहे ?" सेवक म्हणाला, “महाराज हा उंट आहे." “मग तो झोपलेला का आहे ?" 

सिद्धार्थाने विचारले: सेवक म्हणाला, 'महाराज तो झोपलेला नाही, तर तो मरण पावला आहे. " सिद्धार्थाने 'मरण' हा शब्द प्रथम ऐकला होता. त्याने विचारले मरण काय असते ? तेव्हा कोणी तरी सांगितले कि, मरणानंतर शरीर नष्ट होते. थोडयावेळाने त्याने का वृद्ध व्यक्तिला पाहिले. परत विचारले, "हा मनुष्य असा का आहे ?" उत्तर मिळाले कि, "हा मनुष्य म्हातारा आहे. म्हातारपणी सर्व अशीच होतात". 

अजून पुढे गेल्यावर पाहिले कि, काही लोक प्रेत घेऊन जात होते. "हे काय आहे ?" हया वर उत्तर मिळाले, "हा मनुष्य मरण पावला आहे. त्याला जाळण्यासाठी नेत आहे." तो समजून गेला कि मला सुद्धा म्हातारपण येणार, आणि मरण ही येणार. मग तो जंगलाच्यादिशेने चालू लागला आणि पुढे जगात संदेश देवू लागला

आज जगात खूप देशात बुद्धाच्चा प्रतिमा मिळतात. काही देश त्याचे अनुयायी बनले.

बोध: जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला म्हातारपण आणि मरण हे येणारच म्हणून माणसाने स्वार्थ ना ठेवता लहान मोठ्याचा फरक न करता  सगळ्यांशी  आदराने  वागले पाहिजे व चांगले कार्य केले पाहिजे.