एक अपूर्व सोहळा Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohala
राज्याभिषेक का केला ?
रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यांतून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता दयावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली.
स्वराज्याची पहिली राजधानी Capital of Swarajya
शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली Raigad is the capital of Swarajya. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानीदेवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले.
राज्याभिषेकाची तयारी Preparations For Rajyabhishek
शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजेरजवाडे, विद्वान ब्राम्हण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशीक्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडेतिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली.
राज्याभिषेक सोहळा Rajyabhishek sohala
राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वादये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदीआनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातांत होते. गागाभट्ट यांच्या हातांत सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नदयांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले.
घागरीच्या शंभर छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रृंवाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य मासाहेब! धन्य शिवराय ! मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, "क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो.” सर्वांनी जयजयकार केला.
गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशा प्रकारे Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Date तारीख ६ जून सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी "राज्याभिषेक" Rajyabhishek हा युग सुरू केला. शिवाजी महाराज ‘युगकर्ते' राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली.
हिंदवी स्वराज्य स्थापन केले Hindavi Swarajya
राज्यकारभाराची घडी : शिवरायांनी जिवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. Chhatrapati Shivaji Maharaj was the Sansthapak of Hindavi Swarajya हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. स्वराज्यातील प्रजा सुखी होती. देव-देवळे
सुरक्षित होती. त्याचप्रमाणे इतर धर्मांचीही प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती, मात्र स्वराज्यावर
अनेक संकटे येत होती. या संकटांतून पार पडून स्वराज्य कायम टिकावे, अशी शिवरायांची
इच्छा होती. राज्य कायम टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल, तर त्यासाठी
राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते. ती शिवरायांनी बसवली. राज्यकारभाराचे काम
व्यवस्थित चालावे, म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यांत विभागणी केली. प्रत्येक
खात्यावर एकेक प्रधान नेमला. प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले. हेच 'शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ.' Ashtapradhan mandal of shivaji maharaj
प्रधान अमात्य सचिव
मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री
सेनापती त्यात असे सुजाणा
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा ।।
या चार ओळींत शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले
आहेत. यांतील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे
लागत, म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई करावी लागे. शिवरायांना
माणसांच्या गुणांची पारख होती. एखादा रत्नपारखी एकेक मोती पारखून तोलून घेतो आणि
त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या
अष्टप्रधानांची निवड केली होती. त्यांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा
जहागिरी दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला.
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ Chhatrapati Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal
|
प्रधानाचे नाव |
पद |
काम |
१ |
मोरो त्रिंबक पिंगळे |
प्रधान |
राज्यकारभार चालवणे |
२ |
रामचंद्र निळकंठ मुजुमदार |
अमात्य |
राज्याचा जमाखर्च पाहणे |
३ |
हंबीरराव मोहिते |
सेनापती |
सैन्याचे नेतृत्व करणे |
४ |
मोरेश्वर पंडितराव |
पंडितराव |
धर्माची कामे पाहणे |
५ |
निराजी रावजी |
न्यायधीश |
न्यायदान करणे |
६ |
अण्णाजी दत्तो |
सचिव |
सरकारी आज्ञापत्रे पाठवणे |
७ |
दत्ताजी त्रिंबक वाकनीस |
मंत्री |
पत्रव्यवहार सांभाळणे |
८ |
रामचंद्र त्रिंबक डबीर |
सुमंत |
परराज्याशी संबंध ठेवणे |
शिवरायांची संरक्षण-व्यवस्था शिवरायांचे सैन्य Chhatrapati Shivaji Maharaj Defense System and Army
शिवरायांच्या सैन्याचे Chhatrapathi Shivaji Maharaj Sainya Ghod dal and Paydal घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. तसेच आरमारदल Aarmar dal हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे. सैन्यातील घोडदळातही दोन विभाग होते. एक विभाग बारगिरांचा होता. त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत. बारगिरांना मासिक पगार दिला जाई.
घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वत:चा घोडा व स्वत:ची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत. या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत. शिवरायांची सैन्यावर जरब होती. त्यामुळे त्यांचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांना पगार वेळच्या वेळी मिळे.
मराठ्यांचे आरमार Aarmar of Maratha's
आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील
शत्रू. त्यांना शिवरायांनी जेरीस आणले. समुद्रावर सिद्दी, पोर्तुगीज व
इंग्रज हे शत्रू होते. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमारदल उभारले.
मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक
मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांसारखे
समुद्रकिल्ले Sea forts of Shivaji Maharaj बांधले. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या.
शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूवर जबर वचक बसला.
त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते Chhatrapati Shivaji Maharaj had 300 forts. किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त होता. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत.
हेर खाते Spy Account
शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडान्खडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत.
मुलकी व्यवस्था Civil System
राज्यातील मुलकी व्यवस्थाही शिवरायांनी चोख ठेवली होती. स्वराज्यात बारा सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत. सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुभ्याचे काही विभाग असत, त्यांना परगणा म्हणत. परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत. राज्याचा कारभार शिवराय स्वत: बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वतः करत. प्रधानांना कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे. राज्यकारभारात हिंदू, मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही. त्यांनी गुणी माणसांना जवळ केले. त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले. त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला. स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही. फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केल्या. मग तो आपला असो किंवा परका असो. अशा प्रकारे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता.
मोहिमेचा बेत : राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत Death of Jijabai १७ जून १६७४ रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते; परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरू होत्या.
आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दु:ख झाले; परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती; परंतु उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल, याचा नेम नव्हता.
मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे, असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती. त्यातील काहीही वाटा व्यंकोजीराजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे, तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा हेतू शिवरायांच्या मनात होता.
गोवळकोंड्याला भेट Govalkonda Meeting
कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले Chhatrapati Shivaji Maharaj in Karnataka. गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशाहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते, तेव्हा प्रथम कुतुबशाहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे, अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती Govalkonda is Capital of Kutubshah. कुतुबशाहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला.
शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शायिस्ताखानाची फटफजिती आणि आग्ऱ्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगांची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरांतून लोक महाराजांवर फलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशाहाच्या दरबारात आले.
कुतुबशाहा Kutubshah त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागतसत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली : शिवराय पूर्वकिनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटेमोठे किल्ले जिंकले.
व्यंकोजीराजांची भेट Meeting of Vyankoji Raje
महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे Vyankoji Raje यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे, अशी त्यांनी त्यांना गळ घातली. काही दिवस व्यंकोजीराजे महाराजाबरोबर राहिले; परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला, तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला.
आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, ‘परक्या शत्रूचा भरवसा धरू नये. पुरुषार्थ गाजवावा.'
कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. या वेळी महाराजांचे वय पन्नास वर्षांचे होते. तीस-पस्तीस वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही.
रयतेचा वाली गेला Death of Chhatrapati Shivaji Maharaj
Shivaji Maharaj Death Date तारीख ३ एप्रिल १६८०. सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी रायगडावर जगाचा कायमचा निरोप घेतला Shivaji Maharaj Death Place Raigad Fort. रयतेचा वाली गेला! आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते.