छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा Chhatrapati shivaji maharaj the king of the ryots

रयतेच्या सुखासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य 

वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी जहागीर मिळाली होती. या लहानशा जहागिरीतून त्यांनी स्वराज्य' निर्माण केले. लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला. त्यांनी लोकांना जागे केले, स्वाभिमानी बनवले. 



त्यांनी लोकांची संघटना उभारली. आपला जीव धोक्यात घातला आणि बलाढ्य शत्रूचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याची चोख व्यवस्था लावली. त्यामुळे रयत सुखी झाली. 

सेवकांवर माया : शिवरायांची आपल्या सेवकांवर मोठी माया होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करलेशिवरायांनी त्याच्या मुलांचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केलेशिवरायांनी स्वत: त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले. आम्ऱ्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव धोक्यात घातलाशिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. शिवरायांनी त्याच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम याच्याशी केले. अशा किती गोष्टी सांगाव्या ! शिवराय राजे होतेपण आपल्या सेवकांची त्यांनी पित्यासारखी काळजी घेतली. 

रयतेचे रक्षण Protecting the ryot

शायिस्ताखान स्वराज्यावर चालून आलात्या वेळची गोष्ट. खानाची फौज पिके तुडवतलोकांना त्रास देतमुलूख उद्ध्वस्त करत येऊ लागली. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले, ‘तमाम रयतेला घाटाखाली पाठवा. जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा. आळस करू नका. या कामासाठी रात्रीचा दिवस करा. गावोगावी फिरा. लोकांना आसरा मिळवून दया. मुघलांनी लोकांना कैद केलेतर ते पाप तुम्हांला लागेल.शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली.  

चांगले ते केले : जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणेहा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. देशमुखदेशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धत बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाकारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहेअसे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. 

कडक शिस्त : राज्यात कुठे काय चालले आहेयाची शिवरायांना खडान्खडा माहिती असेकारण त्यांचे हेर खाते चोख होते. फितुरीपासून राज्याला धोका असतोम्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली होती. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नयेरयतेला लुटू नयेअशी सैन्याला सक्त ताकीद होती. नियमांचा भंग करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत. 

दिलदार शिवराय : शिवराय पराक्रमाने थोर होतेतसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जातीजमातींना जवळ केले. सर्व जातीजमातींतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात त्यांनी स्थान दिले. धर्मजात न पाहता माणसाची योग्यता पाहन ते त्यास नोकरीला ठेवत. शिवरायांच्या आरमारी दलात कोळीभंडारी होतेतसेच मुसलमानही होते. महाररामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राम्हण व प्रभू जमातींकडे सोपवले होते.

Kutubshah Bhet

 

शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होतेमराठे होतेमुसलमान होते. त्यांच्या पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. त्यांच्या आरमारदलातील अधिकारी दौलतखानसिद्दी मिसरीतसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते. ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. कुतुबशाहा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गोवळकोंडा येथे बरोबरीच्या नात्याने झालेली हृदय भेट भारतीय समाजाला ऐक्याची नवी दिशा दाखवणारी आहे. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुरआन शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. लढाईत हाती लागलेल्या कोणाही स्त्रियांच्या अब्रूस त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही. 

उदार धार्मिक धोरण  Liberal religious policy

शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदललापण पुन्हा त्याला स्वत:च्या धर्मात परत यावे असे वाटलेतर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहणा होता. तो विजापूरच्या आदिलशाहाच्या चाकरीत होता. आदिलशाहाने त्याला स्वत:च्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हतेपण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवलेतेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदललापण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झालीतेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. 

नेतोजी पालकर Netoji Palkar

नेतोजी Netoji Palkar शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला प्रतिशिवाजीम्हणत. एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी मुघलांना जाऊन मिळाला. शिवराय आग्ऱ्याहून निसटून महाराष्ट्रात आलेत्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशाहाकडे पाठवले. बादशाहाने त्याला आग्ऱ्यास पाठवले. नेतोजी आग्ऱ्याला गेला. 

Netoji Palkar Swadharmat


बादशाहाने त्याला मुसलमान केले. नेतोजी पालकर आता 'मुहम्मद कुलीखानझाला. तो बादशाहाची चाकरी करू लागला. बादशाहाने त्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. तेथे त्याने पराक्रम गाजवला. दहा वर्षे लोटली. एकदा बादशाहाने दिलेरखानाबरोबर नेतोजीला शिवरायांवर पाठवले. तो दक्षिणेत आला. नेतोजीचे धर्मांतर झाले असलेतरी शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता. त्याला आपले पूर्व आयुष्य आठवले. त्याचे मन उचंबळून आले. त्याच्या मनात स्वराज्याची व स्वधर्माची प्रीती जागी झाली. 

एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून तो थेट शिवरायांजवळ आला आणि म्हणाला, “मी परधर्मात गेलोपण मला आता स्वधर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा स्वामी परधर्मात गेलोपण मला आता स्वधर्मात येता येणार ?' शिवराय म्हणाले, “का नाही तुमची इच्छा असेलतर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकाल.” नेतोजी विनवणी करून शिवरायांना म्हणाला, “मग मला हिंदू धर्मात घ्या.” शिवरायांनी शास्त्री आणि पंडित यांची बैठक भरवली. ते म्हणाले, “पंडित हो ! नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही. त्यांना जवळ घेणे हा धर्म आहे.” शिवरायांनी नेतोजी पालकरला पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजीने पुष्कळ वर्षे स्वराज्याची सेवा केली.

स्फूर्तीचा जिवंत झरा

स्फूर्तिदाता छत्रपती शिवाजी महाराज  

शिवरायांनी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य निर्माण केलेअशक्य होते ते शक्य करून दाखवलेम्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते. मातृपितृभक्ती : शिवराय नेहमी मासाहेबांच्या आज्ञेत वागले. मासाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. शहाजीराजांविषयी त्यांच्या मनात अपार आदर होता. एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला आले. शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी वडिलांना पालखीत बसवले. त्यांचे जोडे आपल्या हातांत घेऊन पालखीबरोबर ते चालू लागले. केवढी ही पितृभक्ती ! जिजाबाई व शहाजीराजे या थोर मातापित्यांचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले. 

साधुसंतांचा आदर Respect for Saints

शिवरायांची कुलदेवता भवानीदेवी. तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. ते साधुसंतांना फार मान देत. 

Bhavani Devi Pratapgadh

भवानीदेवी

त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुरआन शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थनामंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंदगागाभट्टधुंडिराजभूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकारामसमर्थ रामदासबाबा याकूतमौनीबाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. 'सज्जनांना राखावेदुर्जनांना ठेचावेहा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला. 

स्वदेशाभिमान Pride of country

शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हतीपण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला. आपल्या देशात आपले राज्य व्हावेप्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावेसर्वांना सुखासमाधानाने जगता यावेमराठी भाषेलास्वधर्माला मान मिळावायासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेशस्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि त्यात ते यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेतयासाठी त्यांनी राजव्यवहारकोश हा ग्रंथ तयार करून घेतला. 

हिंदवी स्वराज्य Hindavi Swarajya

हिंदवी स्वराज्य Hindavi Swarajya हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारेमग ते कोणत्याही धर्माचे असोतकोणत्याही जातीचे असोत. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. शत्रू बलाढ्य होतेपण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होतापण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाहाच्या बाजूने लाखो लोक होतेपण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली. बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत. 

शिवरायांचे आठवावे रूप 

काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायचीसंकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचेबलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचेसहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूना सतत चुकवत यश मिळवायचे- हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. 

Shivrayanche Athvave Rup


आदर्श पुत्रसावध नेताकुशल संघटकलोककल्याणकारी प्रशासकहिकमती लढवय्यादुर्जनांचा कर्दनकाळसज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माताअसे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिलेकी पुन्हापुन्हा वाटते - 'शिवरायांचे आठवावे रूपशिवरायांचा आठवावा प्रताप ।।'