छत्रपती शिवाजी महाराज भाषण Chhatrapati Shivaji Maharaj Bhashan

Chhatrapati Shivaji Maharaj Bhashan छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती Shivaji Maharaj Jayanti मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने 'छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj की जय' असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली?

Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj 

शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले,तो काळ मध्ययुगाचा होता. Shivaji Maharaj History त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत; पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले. की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.

शिवाजी  महाराजांच्या आधीचा काळ  Time Before Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वत:चे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघडउघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. 

Time Before Shivaji Maharaj

रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, 
देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत. आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. 

शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातिधर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मांतील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली, की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. 


शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन-चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. संतांची शिकवण शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेच्या कामी उपयोग झाला. 

मराठा सरदार आणि भोसल्यांचे घराणे Maratha Sardar-Bhonsale Family

धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनांत भक्तिभाव निर्माण केला, तर Maratha Sardar शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. Adilshah Of Vijapur विजापूरचा आदिलशाहा आणि Nijamshah Of Ahamadnagar अहमदनगरचा निजामशाहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. 

Maratha Sardar

Maratha Sardar

शूर मराठा सरदार Maratha Sardars Information 

मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. Maratha Sardar मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत. 

विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे Maratha Sardar Names मराठे सरदार होते. त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री Jijabai जिजाबाई या सिंटरवेटच्या लवजी जाधवांच्या कन्या होत्या. 

शौर्याची परंपरा : हे सारे सरदार शूर वीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्या वेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे; पण असे असले तरी, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. Maratha Sardar मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे Bhosale Family भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. 
Grishneswar Jyotirlinga Temple


Grishneswar Jyotirlinga Temple

घृष्णेश्वराचे मंदिर : सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे-जाणारेही हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्य मनातले श्रीशिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडीमाणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त ? ते होते मालोजीराजे भोसले.

वेरूळचे भोसले : वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटिलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. 



मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या Mughal Empire King मुघल बादशाहाने स्वारी केली होती. त्या वेळी दौलताबाद ही निजामशाहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. Nijamshahi Kingdom निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली. 

भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई Jijabai मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी दरबारातही त्याची मोठी प्रतिष्ठा होती. त्यानी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. Jiajabai Full Name जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. 

शहाजीराजे Shahaji Raje

निजामशाहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. Nijamshahi निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा Aadilshahi आदिलशाहाही त्याला मिळाला, तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. 

Shahaji Raje

शहाजीराजे 

अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण Shahaji Raje शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. 

आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. Mughal Empire History मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.