छत्रपती शिवाजी महाराज इतिहास Chhatrapati Shivaji Maharaj History

Chhatrapati Shivaji Maharaj History

Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज इतिहास Shivaji Maharaj History ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. पुणे हे शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धावपळीत त्यांना ठेवायचे कुठेहा प्रश्न उभा राहिला. 

शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची Shivneri Fort आठवण झाली. तेव्हा जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी Shivneri हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. 

Shivneri Fort

शिवनेरी किल्ला  Shivneri Fort

किल्ला मोठा मजबूत होता. त्याचे किल्लेदार विजयराज हे होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. शिवाजी महाराजांचा जन्म Shivaji Maharajancha Janm फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे Shivaji Maharaj Was Born On  १९ फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदीआनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव 'शिवाजी' ठेवले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण Childhood Of Chhatrapati Shivaji Maharaj

शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली; पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. 

Rajmata Jijabai And Shivaji Maharaj
जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ! ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले सवंगड्यांसोब चणे हे त्यांचे छंद ! लपंडाव, चेंडू, भोवरा हे न्यांचे नेहमीचे खेळ. 

Savangadyansobat Shivaji Maharaj
शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा निजामशाहा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशाहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाहा Mughal King Shahjahan शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. 

त्या दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहाचीच हत्या केली. निजामशाहीत अंदाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूख मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला, तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. 

नव्या निजामशाहीची स्थापना New Nijamshahi Establishment

वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. 

आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशाहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाहा शाहजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाहास खरडपट्टी दिली, तेव्हा आदिलशाहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले; परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाइलाज होऊन १६३६ साली त्यांनी मुघलांशी तह केला. 

शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही; परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला.

जिजाबाई व शिवाजी महाराज कर्नाटकात Jijabai And Shivaji Maharaj in Karnataka

शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे-सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशाहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशाहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. 

Shahaji raje ,Shiray, Jijabai

शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील बालपण गोंधळात गेले होते. आज या किल्ल्यावर, तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ-शिवबांची धावपळ चालू असायची. त्या वेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. 

पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशाहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखादया राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरवू लागले.

रायरेश्वराचे देवालय हे पुण्याच्या नैर्ऋत्येला होते. मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते श्रीशंकरापाशी मागणे मागत होते.

Shivaji Maharaj History

शिवाजी महाराजांच्या शिक्षणास प्रारंभ Beginning Of The Education Of Chhatrapati Shivaji Maharaj

स्वत: शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय देला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. 

थोड्याच काळात शिवराय लिहिण्या- वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.


Shivaji Maharajanche Shikshan

Chhatrapati Shivaji Maharaj History

अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विदया व कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज, तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले

पुण्याचा कायापालट Punyacha Kayapalat

जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंचउंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूपखूप आनंद झाला. त्या वेळचे पुणे आजच्याइतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती. 

जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ-संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. 

दादाजी कोंडदेवांची कामगिरी Dadaji Kondevanchi Kamgiri

जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव Dadaji Konddeo पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते, तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. 

Dadoji Kondeo
शेतकऱ्यांनी शेतांत लागवड करावी, म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. 

दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. 

शिवाजी महाराजांचे शिक्षण Education Of Chhatrapati Shivaji Maharaj

शिवराय पुणे जहागिरीत आले, तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विदया व भाषा शिकवल्या. 

उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विदया शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. 

Chhatrapati Shivaji Maharaj History

राजमाता जिजाबाईंची शिवरायांस शिकवण  Teachings Of Rajmata Jijabai To Shivaji Maharaj

जिजाबाई Jijabai ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होत्या. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. 

Rajmata Jijabai
Rajmata Jijabai History
जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला, तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशाहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दु:ख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वत:च आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. 

मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी-कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे, असे शिवरायांना वाटे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. 

Rajmata Jijabai History
जिजाबाई म्हणत, "शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण. त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तूसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तूसुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील." आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपरुष शिवरायांना सतत ध्यानी.

मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले, तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले. 

शिवरायांचा नवा अंमल New Implementation Of Shivaji Maharaj

पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज नीळकंठ पेशवे, बाळकृष्ण

हनमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा, म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता ! 

शिवाजी महाराजांचा विवाह Marriage of Shivaji Maharaj

Maharani Saibai
Maharani Saibai

त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होतीतेव्हा जिजामाता म्हणाल्या, “आता शिवबाचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत.” मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई Saibai. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला.

 

शिवाजी महाराजांचे बालपणाचे विचार Shivaji Maharaj's Childhood Thoughts  

शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होतेपण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, “गड्यांनोमी आज तुम्हांला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू काआमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हांला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. 

सर्व कसे छान चालले आहेपण गड्यांनोमला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे कादुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे काआपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. 

कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी ! आपण हे किती दिवस सहन करायचेदुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे सांगातुम्हीच सांगा ! वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का ?" शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. 

रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला,  “बोला बालराजेबोला. आपला मनोदय सांगा आम्हांला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत.” “हो राजेतुम्ही जे सांगाल ते आम्ही करू ! आमचे प्राणही देऊ !” ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. 

स्वराज्याची शपथ Swarajyachi Shapath

मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, “गड्यांनो ! आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचेसर्वांनी खपायचेसर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य'! Hindavi Swarajya तुमचेमाझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठाया रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. Chhatrapati Shivaji Maharaj Swarajya Sthapana स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार.” सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.

Swarajyachi Shapath
Swarajyachi Shapath
"हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावेअसे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.” शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडलेते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. चडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. या माउलीला धन्यधन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशाअसा विश्वास त्यांना वाटू लागला. 
Chhatrapati Shivaji Maharaj History

मावळ खोऱ्यातील जमवाजमव Maval Khoryatil Jamajav

शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन  ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावीडोंगरांतील आडमार्ग शोधावेखिंडीचाटचोरवाटा निरखाव्याअसा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंत:करणे जंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. 

शिवरायांसाठी जगायचेशिवरायांसाठी मरायचेअसे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आलेसमुद्राला भरती यावी तसे. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोटकिल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटाभुयारेतळघरेदारूगोळाहत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडान्खडा माहिती मिळवली. 

मावळांतील सोबती Mavlantil Sobati

बारा मावळांत ठकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा वेलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहेहे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत. त्यांची समजूत घालत. 

Mavlantil Sobati

Maval Khoryatil Jamajav

स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केलेपण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळहैबतराव शिळमकरबाजी पासलकरविठोजी शितोळेजेधेपायगुडेबांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळांत स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. 
Chhatrapati Shivaji Maharaj History

शिवाजी महाराजांची राजमुद्रा Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra

शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा Rajmudra तयार केली होती. ती मुद्रा अशी - प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंय होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहेअसे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फार्सी भाषेत  कोरलेल्या असतपण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. 

Rajmudra
स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवीस्वधर्म हवा. त्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहेहे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले.