छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापना Chhatrapati Shivaji Maharaj Swarajya Sthapana

Chhatrapati Shivaji Maharaj Swarajya Sthapana

Chhatrapati Shivaji Maharaj Swarajya Sthapana

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. 

तोरणगड Torna Fort 

शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील  किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य ! ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला, की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले. 

Torna Fort


तोरणा किल्ला  Torna Fort information in Marathi शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैर्ऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे.

 किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे. ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांत तोरणा किल्ला गणला जातो. 

किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला 'तोरणा' हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, की दारूगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे त्यांनी ठरवले. 

स्वराज्याची नौबत झडली Swarajyachi Nobat Zadli

निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला 'प्रचंडगड' असे नाव दिले. 

भवानीमातेचा आशीर्वाद Bhavani Devi Blessings 

तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राम्हण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जातीजमातींतील शूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातिभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य ! मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी, काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या ! कामकऱ्यांना आनंदीआनंद झाला. 

'शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले', असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते ! ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारूगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले. तो बेत असा. 

तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा, असे शिवरायांनी ठरवले. 

स्वराज्याची पहिली राजधानी The First Capital Of the Swarajya

एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. 

Rajgadh Pali Darwaja


शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले 'राजगड' Rajgadh Fort. गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, बारा महाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. 

स्वराज्याची घोडदौड Swarajyachi Ghoddaud

शिवरायांची घोडदौड सुरू झाली. बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. बारा मावळांत आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले; परंतु तांदळात जसे काही खडे असतात, तसेच मावळांतही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशाहाच्या कानी घातली. 

शिवरायांचे चातुर्य 

आदिलशाहा विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली. 'जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वत:कडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा,' असे शहाजीराजांनी आदिलशाहास कळवले. शिवरायांनीही आदिलशाहाकडे जासूद पाठवला. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.' असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली.

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त Swakiya Shatruncha Bandobast

शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळांतील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे, असे ते मानत होते. साधी-भोळी मराठमोळी माणसे ती ! त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत; पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशाहाच्या चाकरीत होते. आदिलशाहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले. 


कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला; परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले. तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, हे तर शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या; तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या. 


शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते. हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत. जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले. 


शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यांत खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशाहाचे जहागीरदार होते. आदिलशाहाने त्यांना 'चंद्रराव' हा किताब दिला होता. जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती! त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे, पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी. त्याला कारण असे - दौलतराव मोरे १६४५ साली मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले. 


शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. त्या वेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले. त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले, पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार ! तो बेपर्वाईने वागू लागला. 


स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे, अशी दांडगाई यशवंतराव करू लागला. वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल, हे शिवरायांनी ओळखले. 'बंड केलिया मारले जाल' : शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले. 'तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.' यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले, 'तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणी दिधले? येता जावळी, जाता गोवली....आम्हांस श्रींचे कृपेने आदिलशाहाने राजे हा किताब, छत्रचामर, सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. येथे उपाय कराल तर अपाय होईल.


शिवरायांनी उलट टोला दिला, 'जावळी खाली करून, राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन, हजुराची चाकरी करणे. इतकियावर बंडखोरी केलिया, मारले जाल.' जावळीभोवती घनदाट जंगल होते. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. मोरे मंडळीही पुष्कळ होती. जावळी जिंकणे सोपे नव्हते. भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली. 


सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली, पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला. शिवरायांनी जावळी घेतली. नंतर शिवराय रायरीवर चालून गेले. त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंतराव तीन महिने निकराने लढला, पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली. 

किल्ले रायगड Raigad Fort

जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता. त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. 


Raigad Fort


हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव 'रायगडRaigad Fort ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्याचे नाव ठेवले प्रतापगड Pratapgad Fort.

प्रतापगडावरील पराक्रम Pratapgadavaril Parakram Might on Pratapgad Battle

विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता. 'शिवाजीचा बीमोड कसा करायचा?' बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, “सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला ?" दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजलखान Afzal Khan. 

खानाने विडा उचलला Khan Took Responsibility 

तबकातील विडा उचलत अफजलखान म्हणाला, “शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो.अफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार Afzal Khan was the chief of the Bijapur court. तुफान ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा ! अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खूश झाला. 

दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, 'आता शिवाजी भोसले कसला जिवंत राहतो ! थोड्याच दिवसांत विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार.' अफजलखान Afzalkhan मोठ्या ऐटीने, थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजलखान बारा वर्षे वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. 

स्वराज्यावरील संकट  

शिवराय त्या वेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान Afzal Khan And Shivaji Maharaj History चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले, हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला - खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही ! त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून, तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. 

अफजलखानाचे डावपेच  Afzal Khan And Shivaji Maharaj Story

शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहीत होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट ! 

Afzal Khan And Shivaji Maharaj Story

शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे, म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील, असा खानाचा डाव होता. 

शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही, तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, 'तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत दया. तुम्हाला मी आदिलशाहाकडून सरदारकी देववितो.

शेरास सव्वाशेर  Afzal Khan VS Shivaji Maharaj 

खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे, हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, 'खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. 


Pratapgad Fort

                                                   Afzal Khan And Shivaji Maharaj Story 

आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे येण्याची भीती वाटते.' शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला. वा! बहोत खुशी!' आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद ! हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो ! आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस्स ! खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. 

भेट ठरली  

प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक-एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे, असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करवून घेतली. 

                                                 Afzal Khan And Shivaji Maharaj Story

भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे, याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये, असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले, पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. 

भेटीची तयारी  Afzal Khan And Shivaji Maharaj Meeting

भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानीदेवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायांत सुरवार चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यास जिरेटोप घातला. त्यावर मंदील बांधला. डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चढवली. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले.

Bhetichi tayari


बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, “गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानीआई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो !'' शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. 

मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, “शिवाजीराजे आत का येत नाहीत?" वकील म्हणाला, "ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा !"बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, “या, राजे, भेटा आम्हांला."

अफजलखानाशी झटापट Afzalkhan Vadh

महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. 

Afzalkhanashi Bhet


शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. 

खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. Afzal Khan Death एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणाखणी ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार, एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा', अशी म्हणच पुढे रूढ झाली. या वेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला. 

अफजलखानाच्या फौजेची दाणादाण 

विजयी शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजलखान  कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला.  त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

विजापूरचा सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हां हां म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.

शर्थीने खिंड लढवली Sharthine Khind Ladhavli Battle

पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला Panhala Won And Adilshah Got Angry

Afzal Khan Vadh अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड Panhalgad जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. Afzal Khan Son Fazalkhan फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. 

पन्हाळगडचा वेढा Panhala Fort Information

सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने Panhala Maharashtra पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला, की सिद्दी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे

Panhala Fort

Panhala Fort Informaion in Marathi

शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. 'लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो,'असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. तो खूश झाला. त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे-पिणे, गाणे-बजावणे व हुक्कापाणी यांत ते दंग होऊन गेले. 

शिवराय वेढ्यातून बाहेर Shivaji Maharaj  Out Of siege

शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. 

दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार, अशी ती योजना होती; पण शिवरायांचे सोंग कोण घेणार ? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे; पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. 

शिवरायांच्या सेवेतील वेषभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजीराजाच पकडला! असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. 

तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे Bajiprabhu Deshpande आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचे सोंग उघडकीस आले, तेव्हा सिद्दीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले. तो अमर झाला.

शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. 

बाजीप्रभूचा बाणेदारपणा Bajiprabhu Pawankhind

चवताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले, आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, “बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया !" शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. 

Bajiprabhi And Shivray

Bajiprabhu Pawankhind

बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, “ महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. 

आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा." बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जिवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, “आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या." 

बाजीने शत्रूला रोखले  Bajiprabhu Deshpande

बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. 

                             Bajiprabhu Pawankhind

खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, “बहादूर मर्दानो, हुशार ! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका." बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. 

एका वेळी तीन-चार माणसे कशीबशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीडदोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. 

खिंडीतील झुंज Pawankhind Battle

इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली. 

Ghodkhindit Bajiprabhu and Shivray

                                Bajiprabhu Pawankhind

शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, “हाणा, मारा." मावळ्यांना स्फुरण चढले. 'हर हर महादेव' अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. 

                              Bajiprabhu Pavankhind Battle

बाजी बेहोश होऊन ओरडला, “शाब्बास माझ्या पठ्यांनो! फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना. होऊ दया जोराचा मारा ! शाब्बास तुमची." दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. 

                              Bajiprabhu Pawankhind

प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. 

बाजीचा पराक्रम Bajicha Parakram Battle

इकडे घोडखिंडीत Ghodkhind शर्थीची झुंज अजून चालू होती. सिद्दी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. 

जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मधेच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. 

ती पावनखिंड Pawankhind



Bajiprabhu Pawankhind


एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो," असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला Bajiprabhu Death. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली, तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, “बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली!" बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. 'पावनखिंडPawankhind या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू !