छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती Chhatrapati Shivaji Maharaj Yudh Niti

शिवरायांची युद्धनीती Chhatrapati Shivaji Maharaj's war strategy

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती


शिवरायांचे शौर्य व धैर्य Chhatrapati Shivaji Maharaj bravery and courage

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा (Pledge of establishment of Swarajya) घेतली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस वर्षांचा हा काळ ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व युद्धनीती  जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले

स्वराज्यासाठी ते आयुष्यभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी तलवार हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळवले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगांनी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर पराक्रमी होते. शक्ती कमी पडली, तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली आणि त्याचा निकाल लावला (Chhatrapati Shivaji Maharaj killed Afzal Khan)

धोधो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या (Siddi johar) वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शायिस्ताखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती युक्तीने ते निसटले ! त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण ! 


सरदारांची स्वामिनिष्ठा Loyalty of Chieftains

छत्रपती शिवाजी महाराज स्वत: शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती ! वीर बाजी पासलकर (Baji Pasalkar) पुरंदर किल्ल्याच्या जवळील खळद बेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी कान्होजी जेधेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊन शिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्यांनी स्वराज्यस्थापनेच्या कामी आयुष्यभर शिवरायांना साथ दिली. फिरंगोजी नरसाळा (Firangoji Narsala)याने चाकणचा किल्ला जिवावर उदार होऊन लढवला. 

सिद्दी जौहराने पन्हाळ्याला वेढा घातला, तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली (Baji prabhu and the memorable battle of ghodkhind). तानाजीने (Tanaji Malusare) मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले. प्रतापराव गुजर यांच्यानंतर शिवरायांनी हंबीरराव मोहिते याची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. त्याने अनेक लढायांमध्ये पराक्रम केला. तसेच जालना स्वारीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिधोजी निंबाळकर याने प्राणार्पण केले. 

महाराजांच्या सेवकांनी दाखविलेल्या स्वामिनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. 


शिवरायांचा गनिमी कावा Ganimi Kava

छत्रपती शिवाजी महाजाचें सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या, भरपूर दारूगोळा होता, शेकडो तोफा होत्या, पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूख. इथे डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा दयावा हे शिवरायांनी ठरवले. 

शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले, यात त्यांची केवढी चतुराई दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडान्खडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. 

डोंगराळ भागात अशा लपूनछपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच 'गनिमी कावा(Ganimi Kava) म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला. 


डोंगरी किल्ले Hill Forts

छत्रपती शिवाजी महाराजांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारूगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले. मग शिवरायांची किल्ल्यावरील लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन-दोन वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला, तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखादया शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली आणि नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली, याचे इंगित हेच होते. 

किल्ल्यांचे रक्षण Defense of forts

किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर भिन्नभिन्न जातीजमातींची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. 

चौथाई

स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत, त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 

Vijaydurg

किल्ला विजयदुर्ग 

आरमारदल उभारले

सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे, हे शिवरायांनी ओळखले होते, म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले, की आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले, म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.

शायिस्ताखानाची फजिती Shaistakhanachi Fajiti

शायिस्ताखानाची स्वारी Aurangzeb Transferred Shaista Khan to Pune

विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. 

मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने आपला मामा शायिस्ताखान (Shaistakhanयाला शिवरायांवर पाठवले (Aurangzeb transferred shaista khan to pune). तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेपुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. 

मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे! चटणीभाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. 

फिरंगोजी नरसाळा Firangoji Narsala

मग शायिस्ताखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शायिस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शायिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शायिस्ताखान खूश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही.

लाल महालात शायिस्ताखान Shaista Khan in Lal Mahal 

शायिस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला (Shaista khan laid siege to the fort of Lal Mahal). एक वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. 

धाडसी बेत : शायिस्ताखानाची खोड मोडायचीच, असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता, हे एका दृष्टीने शिवरायांना सोईचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे, असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा ! महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. 

लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शायिस्ताखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र. वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत, कोणी मेण्यांत, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपला होता.

शायिस्ताखानाची खोड मोडली

वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वत:चाच वाडा तो! त्यांना त्याचा कोनाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शायिस्ताखान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले.

Shayistekhanachi Khod Modli


शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. 'सैतान ! सैतान !' म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली (Chhatrapati Shivaji Maharaj cut three fingers of Shaista Khan). प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. 'शिवाजी आला, धावा, धावा! पकडा त्याला,' असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. 

खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शायिस्ताखानाने तर हायच खाल्ली. 'आज बोटे तुटली, उदया आपले शीर शिवाजी कापून नेईल', अशी भीती त्याला वाटू लागली. 

औरंगजेब बादशाहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शायिस्ताखानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदीआनंद झाला. 

पुरंदर किल्ल्याचा वेढा व तह Siege and Treaty of Purandar Fort

छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतवर छापा Chhatrapati Shivaji Maharaj's raid on Surat : 

विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सधन. 

शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झराजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. 

अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात, तोच सन १६६४ मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दु:खद बातमी समजली. शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले (In 1664, Shahaji Raja died while hunting). शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले.

Purandar Fort

 पुरंदर किल्ला 

पुरंदर किल्ला Purandar Fort

पुरंदर (Purandar) हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बीमोड होऊ शकणार नाही, हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिददीचा वीर होता. त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. 

दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडिमार केला. माचीचा बुरूज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेरखानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. 

मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने पाचशे मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. 'हर हर महदेव' अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. 

मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत  घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले, ते त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला. 

मुरारबाजीचा अतुल पराक्रम Murarbajicha Parakram

दिलेरखानाला बघून मुरारबाजी (Murarbaji) चवताळला. कापा, तोडा, मुडदे पाडा', असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला, तो ठार झाला. या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला, “थांबा!'' मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. 

Murarbaji Dilerkhan Yuddhprasang

मुरारबाजीचा पराक्रम

दिलेरखान मुरारबाजीला म्हणाला, “मुरारबाजी, तुझ्यासारखा तालवारबाज मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील. जहागीर देतील, बक्षीस देतील!मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, “अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय ? आम्हाला काय कमी आहे ? तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला ?'' मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. 

दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला, किल्लेदार घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले, तो त्यास मुरारबाजी दिसला. 

किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले, पण 'एक मुरारबाजी पडला तरी काय झाले ? आम्ही तैसेच शूर आहो. हिंमत धरून लढतो', असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दु:खी झाले. त्यांनी विचार केला, एकेक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील. शिवरायांना ते नको होते. करणार काय शक्ती चालेनायुक्ती उपयोगी पडेनातेव्हा काही काळ माघार घेणेच योग्यम्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले.

पुरंदरचा तह Treaty of Purandar

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जयसिंगाकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणालेराजे, आपण रजपूत आहात. आमचे दु:ख आपण जाणता. बादशाहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. 

Shivray and Mirzaraje Jaysingh bhet

पुरंदरचा तह

लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावे, म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे ! आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू". जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूख मुघलांस देण्याचे कबूल केले. हा तह १६६५ साली झाला (Treaty of Purandar was concluded in 1665). पुरंदरचा तह झाला. याच वेळी, शिवरायांनी आग्ऱ्यास जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे जयसिंगाने सुचवले. त्यांना सुरक्षिततेची हमी दिली.

जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशाहा कपटी आहे, स्वत:च्या भावांशीसुद्धा त्याने दगलबाजी केली, हे शिवराय ओळखून होते. तरीपण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड दयावे, असे त्यांनी ठरवले. आपण बादशाहाची भेट घेण्यास आग्ऱ्याला जाण्यास तयार आहोत, असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.

 

औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी Aurangzeb Badshahchya hatavar turi

जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब (Aurangzeb) बादशाहाच्या भेटीस आग्ऱ्याला जाण्यास निघाले(Shivaji Maharaj left for Agra to meet Aurangzeb). जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दरमजल करत ते आग्ऱ्यास पोहोचले. 

दरबारातील बाणेदारपणा : ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहाच्या दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता  (Aurangzeb's fiftieth birthday). बादशाहा दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. 

Badshahachya Darbarat Shivray


शिवरायांना वाटले, 'आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचापण बादशाहाने आपल्याला मागील रागेत उभे करावे म्हणजे काय?' त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे बादशाहाचे तोंड पाहायचे नाही, असे त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. 

बादशाहाची दगलबाजी

औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशाहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले, की बादशाहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे. आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. 

एक दिवस शिवरायांनी बादशाहाकडे अर्ज केला, 'मला महाराष्ट्रात जाऊ दया.' पण बादशाहाने ते ऐकले नाही. त्यांनी खूप खटपट केली, पण बादशाहाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला, की काहीही करून बादशाहाच्या कैदेतून सुटून जायचेच. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली. बादशाहाला वाटले, 'बरे झाले. शिवाजीचे बळ कमी झाले.' आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक, एवढेच जण राहिले. 

पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. सोंगच ते ! त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम, वैदय आले. औषधपाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. 

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका Escape of Shivaji Maharaj from Agra

पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले. रोजरोज काय पाहायचे, असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामिभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो' असे सांगून तेथून निसटले. 

Shivaji Maharajanchi Agryahun Sutka


महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला! बादशाहा रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशाहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ ! 

बादशाहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला (Shivaji Maharaj escaped from the emperor's captivity) तो कायमचा ! वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाण ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले.

पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली (Shivaji Maharaj freed himself from Agra). ही घटना सन १६६६ मध्ये घडली. 

गड आला  पण सिंह  गेला The fortress came but the lion went

छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा (Kondhana Fortहा त्यांतलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे.पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला ? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. 

तानाजी मालुसरे Tanaji malusare : 

तानाजी मालुसरे (Tanaji malusare information in marathi) आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई, दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार ! मोठा हिंमतवान गडी ! तो अंगाने धिप्पाड होता. ताकदीने भारी होता. बुद्धीने चलाख होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती.

Tanaji Malusare


आधी लग्न कोंढाण्याचे Kondhana fort

तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या (Tanaji malusare son rayba) लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते.

तानाजीला वाटले, 'महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे.' तो शेलारमामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठ शिवरायांकडे आला. शेलारमामाने शिवरायांन लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, "शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वत: काही लग्नाला येऊ शकणार नाही. कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीव जाणार आहोत.शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, “महाराजतानाजी जिवंत असताना असल्या जिवावरच्य कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद दया." 

तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान  (Udaybhan) हा राजपूत  किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाल दोन दरवाजे होते.

दोन्ही ठिकाणी उदेभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता, तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, “सूर्याजी, तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत, घुसा एकदम, धुव्वा उडवू शत्रूचा. चला.सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले. 

तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावर Tanaji Malusare Kondhana Fort

रात्रीची वेळ होती, तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे पाच-सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच ! पण ते कपारीस धरून, कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय ? तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. 

Tanajichi Kondhanyavar chadhai

Tanaji Malusare Kondhana Fort

तानाजीचा पराक्रम Tanaji's fight with Udayabhan

इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर लागली. नगारा वाजला. उदेभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. 

तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूर वीर ! कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. 

तानाजी पडला, हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दु:ख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. 

पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, “अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता ? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.

मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला (In 1670 Tanaji Malusare died in the battle of Kondhana) . शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, “गड आला, पण सिंह गेला!" कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले (The name of Kondha became Sinhagad). ही घटना सन १६७० मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.